केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी सादर केलेला आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वीचा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प हा शेती क्षेत्राचे कोटकल्याण करणारा आहे, हा सरकारपक्षाचा दावा मुख्य प्रवाहातील माध्यमांनी (विशेषतः मराठी) जसाच्या तसा स्वीकारलेला दिसतोय. `आरोग्यम् कृषिसंपदा`, `स्मार्ट सिटी`मधून शिवाराकडे`, `गावचं भलं, तर आपलं चांगभलं`, `निवडणुकांची नांदी; शेतकरी, गरीबांची चांदी`, `आश्वासनपेरणी` या…
आज संसदेत सादर केला गेलेला २०१८-१९ साठीचा अर्थसंकल्प हा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तयार केलेला अर्थसंकल्प वाटतो आहे. या अर्थसंकल्पात देशातील नाही रे वर्गासाठी अनेक योजनांची भरमार आहे. अनुसुचित जाती जमाती, शेतकरी, वृद्ध, स्त्रिया आणि समाजातील कितीतरी अशा वर्गासाठी यात तरतुदी केल्या आहेत. या पूर्वीच्या अर्थसंकल्पातील गरिबांसाठीच्या व ग्रामीण भागातील…