आज संसदेत सादर केला गेलेला २०१८-१९ साठीचा अर्थसंकल्प हा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तयार केलेला अर्थसंकल्प वाटतो आहे. या अर्थसंकल्पात देशातील नाही रे वर्गासाठी अनेक योजनांची भरमार आहे. अनुसुचित जाती जमाती, शेतकरी, वृद्ध, स्त्रिया आणि समाजातील कितीतरी अशा वर्गासाठी यात तरतुदी केल्या आहेत. या पूर्वीच्या अर्थसंकल्पातील गरिबांसाठीच्या व ग्रामीण भागातील…
सध्या ज्या अवघड अवस्थेत हे सरकार अडकलय ते पाहून कॅच २२ या प्रसिद्ध हॉलीवूडपटाची आठवण येते. दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेतील वायुदलातील वैमानिकांसमोर उभ्या ठाकलेल्या एका पेचा वर हा सिनेमा बेतला आहे. मरण जवळपास निश्चित आहे अशा वायुदलाच्या एका मोहिमेतून वैमानिकांस सहभागी व्हायचे नसेल तर एकच मार्ग आहे. आपण मानसिक…