fbpx
Author

मिहीर पाटील

Browsing

महाराष्ट्रात सध्या शैक्षणिक क्षेत्रात जोरदार घोडदौड सुरु आहे. म्हणजे तशी ही घोडदौड देशातच सुरू आहे म्हणा. न सुरू झालेल्या जिओ विद्यापीठाला उत्कृष्टतेचा दर्जा देऊन केंद्रीय मनुष्यबळविकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी देशासाठी एक नवा शैक्षणिक पायंडा घालून दिलेलाच आहे. आता त्यांचेच लहान भावंड असलेले विनोद तावडे सर्व ए व…

सुषमा स्वराज या देशाच्या परराष्ट्र मंत्री आहेत. आता लेखाची सुरुवात अशी इयत्ता सातवीतल्या निबंधाप्रमाणे का केली याचं कदाचित काही लोकांना आश्चर्य वाटू शकतं. परराष्ट्र खातं हे केंद्राच्या अखत्यारितील खातं आहे. राज्य सरकारं अगदी ३७०वं कलम असताना काश्मीरचं राज्य सरकारही या खात्यात काही ढवळाढवळ करू शकत नाही. आणि त्या…

आपल्या देशात दररोज काही ना काही विनोदी बोलण्याची स्पर्धा असल्यासारखे काश्मिरपासून कन्याकुमारीपर्यंत सर्व पक्षीय नेते, लोकप्रतिनिधी वगैरे शाब्दिक ओकाऱ्या करत असतात. भिडे नावाचा स्वतःला गुरुजी म्हणवणारा एक कुणीतरी म्हातारा आहे म्हणे. त्याने शालेय जिवनात वाचलेली एक जादूची कथा स्वतःच्याच नावावर खपवली. की म्हणे त्याच्याकडे एक आंब्याचे झाड आहे.…

पालघर आणि गोंदिया येथील लोकसभा पोट निवडणुका पार पडल्या आहेत. ईव्हीएम नादुरुस्त झाल्यामुळे अनेकांना आपला मतदानाचा हक्क या निवडणुकांमध्ये बजावता आलेला नाही. त्यात भर म्हणून की काय, निवडणूक आयोगाने प्रचंड उन्हामुळे ईव्हीएम बिघडल्याचा अजब तर्क सांगितला. उन्हामुळे माणसांच्या तब्येती बिघडत असल्याने उन्हाळ्यात करावयाचे उपाय, अशा मथळ्यांखाली विविध दैनिकं…

Congress-JD(S) unity

एच डी कुमारस्वामी यांच्या मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीसाठी मायावती, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, ममता बॅनर्जी, शरद पवार, सिताराम येचुरी, चंद्राबाबू नायडू आदी बहुतांश सर्व भाजपेतर नेत्यांना आमंत्रणे गेली आहेत. अर्थातच सोनिया आणि राहूल गांधी हे तर असणारच आहेत. सांगण्याचा मुद्दा काय, तर मोदी-शहा यांच्या अश्वमेधाच्या घोड्याचा लगाम कुणीच पकडू…

अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण केल्याच्या आरोपावरून आसाराम बापू याला आज जोधपूर न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. एखाद्या धार्मिक गुरूवर लैंगिक शोषणाचा आरोप काही नवीन नाही. याआधी डेरा सच्चा सौदाचा राम रहीम सिंग याच्यावरही लैंगिक शोषणाचा आरोप होऊन तो तुरुंगाची हवा खात आहे. महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांमध्ये लाडकं व्यक्तीमत्व भय्यू…

Death Penalty - India

आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी १२ वर्षांखालील मुलीवर बलात्कार करणाऱ्याला फाशीची शिक्षा निश्चित करणाऱ्या अध्यादेशावर सही केली. गेले काही दिवस कथुआ आणि उन्नाव येथील बलात्काराच्या प्रकरणांवर संबंध देशभर टीका, राग, संताप व्यक्त होत होता. अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरुवातीला मौन पाळलं. पण शेवटी लोकांकडून एवढा दबाव वाढला…

मध्य प्रदेशमधील भाजप सरकारने चार धार्मिक बाबांना  राज्य मंत्री पदाचा दर्जा दिला आहे. यात कम्प्युटर बाबा, भय्युजी महाराज, नर्मदानंद महाराज, हरिहरनंद महाराज आणि योगेंद्र महंत यांचा समावेश आहे. नर्मदा संवर्धनासाठी मध्य प्रदेश सरकारने जी समिती तयार केली आहे, त्या समितीत यांना समाविष्ट केल्याने हा दर्जा त्यांना दिल्याचे सरकारचे…

त्रिपुरात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पराजयानंतर उन्माद इतक्या थराला पोहोचला आहे की, लेनीन यांचा पुतळा जेसीबी लावून पाडून टाकण्यात आला आहे. पुतळा पाडल्यानंतर दाहिने रूख बाये रूख करत हवेत दांडे चालवणारी मंडळी म्हणत आहेत, की लेनीनचा पुतळा पाडला तर इतकं दुःख कशाला करायचं. लेनीन काय भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातला सेनानी…

तिबेटी बौद्ध धर्म गुरू दलाई लामा हे गेली ६० वर्षे भारतात आश्रयास आहेत. तिबेटवर चीनने आपला हक्क सांगितल्यापासून ते भारतात आश्रयास असून तिबेटला चीनपासून मुक्त करण्यासाठी ते जगभरात जनमत घडवत असतात. चीनच्या या दादागिरीला दलाई लामांना आपल्या देशात तब्बल साठ वर्षे आश्रय देऊन आपण उघड विरोध केला आहे.…