आंतरराष्ट्रीय दौ-यावर (ऑगस्ट 2018) गेलेल्या राहुल गांधी यांनी इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर स्ट्रॅटर्जिक स्डडीज येथे आपल्या आपल्या भाषणात म्हटले होते की, “राष्ट्रीय स्वयंसेवी संघटना देशाचा आत्माच बदलण्याचा प्रयत्न करीत आहे. भारतातील अन्य कोणत्याही संघटना अशा नाहीत ज्या इथल्या प्रमुख संस्थांवर ताबा मिळवू इच्छितात… अरब विश्वात अस्तित्वात असलेल्या मुस्लिम ब्रदरहुडप्रमाणे हे आहे. एकच विचारधारा सगळ्या संस्थांमध्ये असावी आणि त्या विचारधारेने बाकीच्या विचारांना चिरडून टाकावं,” आणि ” अन्वर सादच्या खूनानंतर मुस्लिम ब्रदरहडूवर बंदी घालण्यात आली होती. महात्मा गांधींच्या हत्येनंतरही संघावर बंदी घातली होती… सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महिलांना या संघटनांमध्ये स्थान नाही.” याला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी म्हटले की, “सध्याचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा संघाशी संबंध होता आणि गांधीजींची तुलना एका मुस्लिम संघटनेशी करणं याला माफी नाही.”
संघाच्या काही नेत्यांनी म्हटलं की, ज्याला भारत समजला नाही त्याला आरएसएस समजणं अशक्य आहे. संघाच्या राजकारणाच्या स्वरूपाचे विविध प्रकारे विश्लेषण केलं गेलं आहे. शैक्षणिक आणि राजकीय तज्ज्ञांनी संघाच्या खऱ्या राजकारणाचा उकल करण्याचा प्रयत्न केला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा केवळ एक राजकीय संघटना नाही तर त्यापेक्षा काही जास्त आहे. राजकीय पक्ष भाजप हा संघाच्या विविध कामाचा, एकूण संघटनांचा एक एक छोटासा भाग आहे. भाजपाचे सुधांशू मित्तल यांनी एका लेखात असे म्हटले आहे की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न असलेल्या संघटनांनी देशाला मोठं योगदान दिले आहे.
समाजात विविध भागांमध्ये अशा शेकडो अशा संस्था सक्रिय आहेत. या संस्था मोठ्या प्रमाणात आपली विचारसरणी पसरवतात पण त्याएेवजी कोणती कामं गरजेची असूनही ती टाळतात ते पाहूया. संघाशी संलग्न भारतीय किसान संघाबद्दलचे एक उदाहरण घेऊ. शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा जटील झालेला प्रश्न असून संकटात सापडलेल्या शेती क्षेत्राची पार्श्वभूमी त्याला आहे. पण या किसान संघाने कधी हे प्रश्न उचलून धरले आहेत का? चुकीच्या सरकारी धोरणांमुळे ग्रामीण भागामध्ये निर्माण झालेली परिस्थिती या बद्दल ते कधी बोलले आहेत का? हाच प्रश्न आदिवासी क्षेत्रात काम करणाऱ्या संघाच्या संघटनांबद्दल विचारला जाऊ शकतो. त्यांनी कधी आदिवासींच्या प्रश्नांना वाचा फोडली आहे का?
संघ आपण धर्मादाय कार्यामध्ये सहभाग असल्याचा दावा करतो. असले दावे माध्यमांना अनेकदा प्रभावित करतात. कारण संघाचे स्वयंसेवक कसे एखादी आपत्ती अाल्यालवर पहिल्यांदा पोहोचतात, वगैरे माध्यमं सांगतात. विशेष म्हणजे मुस्लिम ब्रदरहूडही धर्मादाय क्षेत्रात कार्यरत आहे. परंतु दोन्ही संघ आणि मुस्लिम ब्रदरहूड, धर्मादाय कार्याविषयी अगदी वरवरचं बोलत राहतात पण त्या सगळ्यामागे त्यांचा हेतू एकच असतो. आपला कार्यक्रम राबवणं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि मुस्लिम ब्रदरहूड या दोन्हींचा प्रयत्न म्हणजे अशी लोकशाही मूल्यांकनाला विरोध करणारी सामाजिक व्यवस्था निर्माण करणे असा असतो. निश्चितपणे संघ आणि मुस्लिम ब्रदरहूड एकच नाहीत. तरीसुद्धा त्या दोघांमध्ये काही समान वैशिष्ट्यं आहेत आणि राजकीय उद्देशही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कितीही मोठा संघटनांचा पसारा उभारला तरी त्याचा मूळ उद्देश हा हिंदू राष्ट्रवाद हाच आहे. भारतीय राज्यघटनेला पाश्चिमात्त्व संबोधून समाजाला पुराणकाळामध्ये नेण्याचा संघाचा प्रयत्न आहे. आता मुस्लिम ब्रदरहूडला काय हवंय ते पाहुया. त्यानेही लोकशाही मूल्यांना, सामाजिक समतेला विरोध केला असून सामाजिक संस्थांवर पाश्चिमात्य असल्याचा शिक्का मारून इस्लामच्या तत्त्वांना पुढे रेटण्याचा प्रयत्न करत असतात.
दोन्ही संघटना या पुरुषप्रधान आहेत आणि इतिहासातील सुवर्णकाळ उगाळून त्याचंच भांडवल करणाऱ्या आणि आधुनिकतेला पाश्चिमात्य म्हणून हिणवणाऱ्या आहेत. इतर संघटना आणि या दोघांमध्ये हा महत्त्वाचा फरक आहे. संघ आपल्या प्रचारकांना प्रशिक्षण देतं आणि ते संघाचाच हेतू पूर्ण करण्यासाठी संघाहून वेगळ्या अशा लहान-मोठ्या संघटना सुरू करतात. मुस्लिम ब्रदरहूड मात्र एकाच छत्रीखाली सर्व गोष्टी करतात.
अगदी १९२० च्या सुमारास अमेरिकेमध्ये आलेल्या ख्रिश्चन मूलतत्त्ववाद्यांमध्येही अशा काही सारख्या गोष्टी दाखवता येतील. साम्राज्यवादानंतर ज्या संघटना अस्तित्वात आल्या त्या धर्माच्या नावाने आणि समानतेला विरोध करणाऱ्या होत्या. पण भारतामध्ये १८८५ मध्ये भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसची सुरुवात झाली तेव्हा सर्व धर्मियांचं एक राष्ट्र आणि समता हा उद्देश डोळ्यासमोर होता.
त्याविरोधात मुस्लीम लीग आणि हिंदू महासभा-राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांना सुरुवातीला पाठिंबा हा सरंजामदार, जमिनदार वर्ग, त्यानंतर उच्च आणि मध्यमवर्गाचा काही भाग यांनी दिला. संघाने हुशारीने अनेक संघटना सुरू करून विविध कामांचं पद्धतशीर वाटप केलं. संघ आणि मुस्लिम ब्रदरहूडमधले हे काही समान दुवे आहेत.
आता पुन्हा संबित पात्राच्या वक्तव्याकडे वळूया. वायपेयी, मोदी, कोविंद यांचा संबंध त्यांनी संघाशी जोडला पण गांधींना मारणारा नथूराम गोडसे याही संघाशी संबंधित होता, ख्रिश्चन फादर स्टेन्सला मारणारा दारा सिंग आणि पबमध्ये जाणाऱ्या मुलींवर हल्ले करणाऱ्या श्री राम सेनेचा मोहरक्या प्रमोद मुतालिक हे दोघेही संघाशी संबंधित होते. मुस्लिम ब्रदरहूडला काही देशांमध्ये दहशतवादी संघटना म्हणून आधीच जाहीर करण्यात आलं आहे तर संघाच्या दोन प्रचारकांना अजमेर स्फोटामध्ये दोषी ठरवण्यात आलं आहे. या दोन्ही संघटनांचा प्रचारकी थाट हा केवळ दाखवण्यापूरता असून त्यांचा उद्देश हा देशविघातकच आहे.