Tag

bramhinism

Browsing

खोले बार्इंच्या तक्रारीतील शब्दन्शब्द ब्राह्मण्याच्या अहंगंडाने ओतप्रोत भरलेला आहे. त्या तक्रारीत सुवासिन असा शब्द त्या वारंवार वापरत आहेत. ब्राह्मणी धर्मानुसार स्त्रियांवर बंधने लादुन जातीव्यवस्थेचा किल्ला हा अधिकाधिक भक्कम केला गेला आहे. त्यासाठी जातीश्रेणी आणि स्त्रियांचा समाज व्यवस्थेतील दर्जा ठरविण्यासाठी त्यांचे वर्गीकरण विविध प्रकारे केले गेले अराहे. ते अत्यंत अपमाजनजनक, मानहानी करणारे असेच आहे. मनुस्मृतीत तर त्याचे हजारो दाखले सापडतात. स्त्रियांवर शूध्दी, पावित्र्याची मूल्यव्यवस्था निर्माण करत पुरुषांशिवाय त्यांचे स्वतंत्र अस्तित्वच नाकारण्यात आले आहे. पिता, पती, मुलगा यांच्या संरक्षण कक्षेत त्यांना बांधुन टाकले आहे. ही बंधने घट्ट आणि चिरकाल रहावीत यासाठी स्त्रियांची ‘सधवा‘, ‘विधवा’, ‘पतीव्रता’, ‘बाजारबसवी’, ‘कुमारीका’, ‘कुलटा’, ‘परित्यक्ता’ इ. विभागणी केली गेली. तिला ब्राह्मणी धर्माच्या मूल्यव्यवस्थेचा सोनेरी-चंदेरी मुलामा दिला गेला. परिणामी या गुलामीतच स्त्रियांना आपली ओळख, आपली अस्मिता आणि अस्तित्व आहे अशा संरचना उभ्या केल्या गेल्या.

–प्रतिमा परदेशी

पुणे हे नेहमीच चित्रविचित्र घटनांसाठी प्रसिद्ध राहिले आहे; खरेतर ब्राह्मणी-पुरुषसत्ताक घडामोडींचे ते माहेरघर आहे. अर्थात सनातन्यांची ती सांस्कृतिक राजधानी असल्याचा हा परिपाक आहे. अगदी १५-१६ व्या शतकापासून पुणे ही ‘सांस्कृतिक रणभूमी’ बनलेली आहे. जगद्गुरु तुकोबांच्या ज्ञानाचे भांडार असणाऱ्या गाथांना जलसमाधी देणारी मंबाजी भटारुपी सनातनी प्रवृत्तीने ज्ञानाचे क्षेत्र ‘सोवळं’ ठेवण्याचा प्रयत्न केला होता.