fbpx
Tag

mahatma phule

Browsing
जिजाबाईंचे चारित्र्यहनन ते फुले दाम्पत्याचे किरकोळीकरण

शारीरिक हिंसा शक्य नसेल त्यावेळी प्रतिपक्षाच्या कर्तृत्त्वाला, त्याच्या मानदंडांना अनुल्लेखाने मारायचे. मौनाच्या या कटानंतरही प्रतिपक्षाचे मानदंड समाजमानसात तगून राहिले तर मग त्यांच्या विरोधात कुजबूज तंत्र वापरायचे. असत्याची पेरणी करण्यासाठी कधी अवास्तव कहाण्या तर कधी संभ्रमित सत्य, आभासी सत्य विविध माध्यमातून कुजबुजत राहायचे. विरोध वाढला की शांत राहायचे, विरोध…

शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस  पक्षाच्या कार्यक्रमात छगन भुजबळ यांना फुले पगडी घालायला लावली आणि महाराष्ट्रात एकदम वादंग सुरू झाले. पवार यांनी पुणेरी पगडीचा अवमान केला. पवार यांनी पुणेरी पगडी नाकारली. त्यांचे भान सुटले आहे. त्यांचा आत्मविश्वास डळमळला आहे. विद्वत्तेची ओळख असलेल्या पुणेरी पगडीलाही त्यांनी क्षूद्र राजकारणात ओढले.…

केले एखाद्याने मनुस्मृतीचं समर्थन तर तुम्ही एवढी तीव्र प्रतिक्रिया का देता? अशा पुराणमतवादी लोकांकडे दुर्लक्ष का करत नाही? आपला वेळ का वाया घालवाता? असे काही प्रश्न मनुस्मृती समर्थनाच्या विरोधात लेख लिहिल्यावर कायम विचारले जातात. ही मंडळी स्वतःला सजग, आधुनिक मानत असतात. मनोहर उर्फ संभाजी भिडे यांनी मनुस्मृतीचे समर्थन…