Author

रमेश जाधव

Browsing

राज ठाकरे यांना दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनी आरक्षणाच्या मुद्यावर व्यक्त केलेल्या मतावरून सध्या गदारोळ माजला आहे. “दलित आणि आदिवासी या समाजांच्या आरक्षणाबद्दल कोणाचीही तक्रार असण्याचे कारण नाही. अन्य घटकांच्या आरक्षणासाठी ठिकठिकाणी मोर्चे निघत आहेत. आरक्षणाबाबत माझी स्वच्छ भूमिका आहे. अन्य घटकांबाबत आरक्षणाचा निर्णय घेताना जातीनिहाय विचार करून…

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले सगळे हातखंडे वापरले. त्यांनी कन्नड भाषेत काही वेळ भाषण केलं, राहुल द्रविड या महान क्रिकेटपटूला कन्नड अस्मितेचे प्रतीक बनवून कन्नडिगांच्या हृदयाला साद घालण्याचा प्रयत्न केला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण शेतकऱ्यांना TOP प्रायोरिटी देत असल्याचे ऐलान…

केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी सादर केलेला आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वीचा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प हा शेती क्षेत्राचे कोटकल्याण करणारा आहे, हा सरकारपक्षाचा दावा मुख्य प्रवाहातील माध्यमांनी (विशेषतः मराठी) जसाच्या तसा स्वीकारलेला दिसतोय. `आरोग्यम् कृषिसंपदा`, `स्मार्ट सिटी`मधून शिवाराकडे`, `गावचं भलं, तर आपलं चांगभलं`, `निवडणुकांची नांदी; शेतकरी, गरीबांची चांदी`, `आश्वासनपेरणी` या…

शेतकऱ्यांनी पुकारलेला संप हे हिमनगाचं केवळ एक टोक आहे. आतली खदखद खूप मोठी आहे. सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांमुळे शेती धंदा नफ्याचा उरला नाही, हे या प्रश्नाचं मूळ आहे. पक्ष कोणताही असो, कॉंग्रेस-राष्ट्रवादी असो की सेना-भाजप, ते जेव्हा विरोधात असतात तेव्हाच शेतकऱ्यांचा कैवार घेतात. सत्तेवर असले की शेतकरी विरोधी भूमिकेत…