fbpx
सामाजिक

तुम रहेना नकाब मे ???

निर्हुतीच्या गण संस्कृतीत स्त्री मुख्या होती. स्त्री-पुरुष विषमता होती, पण पुरुषांना शोषणाला समोर जाव लागत नव्हत. ना हिंसाचाराला बळी पाडाव लागत होत. विशामातही कशा प्रकारची तर राज-कार्याच्या संदर्भातील. गण भूमीचे वाटप करणे हे होत राजकार्य, जे पुरुष करू शकत नव्हते. कारण शेतीचा शोध स्त्रियांनी लावलं, म्हणून त्या गण मुख्या ठरल्या. इतिहासाची चक्र फिरत गेली आणि वर्ण-जाती समाजात स्त्रिया बंधनात ढकलल्या गेल्या.इतक्या की आधी त्या क्रय्य आणि वध्य ठरल्या. म्हणजे त्यांची विक्री होऊ लागली, त्या जिंकून घेण्याची वस्तू ठरवल्या गेल्या. शेतीतून, जमिनीतून त्यांना बेदखल केले जाऊ लागले. त्या उरल्या फक्त श्रमशक्ती म्हणून. राबायचं आणि राबायचं. त्यांना आत्मसन्मान नाकारला गेला, प्रतिष्ठा वर्ण-जातीशी जोडली गेली, त्यांच्या शरीर, मन, श्रम आणि एकंदर साऱ्या अस्तित्वावरच जात-पुरुषसत्तेच नियंत्रण, वर्चस्व  ठेवल गेल. त्या गुलाम केल्या गेल्या. त्यांना वर्ण,जात, धर्म, संस्कृतीच्या जोखडात करकचून बांधून ठेवण्यात आल. इतकेच नाही तर सधावा, विधवा, कुमारिका, वेश्या, बाजारबसवी, वांझ इ. अशी वर्गीकरणे करून जातीजातीच्या श्रेणीरचनेत कप्पेबंद करण्यात आले. जहर प्रथा, कधी विधवा पुनर्विवाहास बंदी, वयात येण्याआधीच विवाह लाऊन देणे,ज्ञान बंदी असे अनेक उपाय स्त्रियांच्या शोषणासाठी, गुलामीसाठी वापण्यात आले. शुद्धीच्या, पवित्र्याच्या संकल्पना व्युहकोषात तिला जेरबंद करण्यात आले. सारे नीतीनियम स्त्रियानसाठीच! बाईच्या जातीन….अस वागू नये चा पाढा रोज तिच्या कानात म्हंटला गेला. घर बाईच आणि दार पुरूषाचं असे सांगत स्त्रियांना सार्वजनिक क्षेत्रातून दूर ठेवण्यात आल. निर्ऋती दुर्गेचा खरा इतिहास काळाच्या पडद्या आड दडवुन टाकण्यात ब्राह्मणवादी यशस्वीझाले आहेत. म्हणूनच मूळ इतिहास आणि त्याचा आजच्या काळातील अन्वयार्थ पुढे आणण्याची गरज आहे. कारण या निर्ऋतीच्या लेकींनाच आजदुय्यम वागणूक, अपमान, मानहानी, हिंसाचाराला मोठ्या प्रमाणात सामोरे जावे लागत आहे. गणमातेचा, आदिमायेचा खरा विचार व वारसा यावरप्रकाश टाकण्याची गरज यामुळेच अधिक मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली आहे.

    स्त्रियांसाठी काळ थोडाफारच बदलतो. काळ बदलत गेला. समाजाचा अर्धा हिस्सा असणारी श्रमशक्ती वाया घालवण परवडणार नव्हत म्हणून त्या सार्वजनिक क्षेत्रात येऊ दिल्या गेल्या; पण त्या जात-पुरुषसत्ताकतेच्या मूळ चौकटीला धक्क लागणार नाही अशा पधतीन. सातच्या आत घरात, पडदा पद्धती, गोषा पद्धती या मागे धर्म-जातीच्या शुद्धतेची, पावित्र्याची संकल्पना काम करताना दिसते. बुरखा घालणे, पडदा पद्धती, बाईच्या जातीन उंबरा ओलांडायचा नाही या संकल्पना मांडण्या मागे स्त्रियांचे ‘चरित्र जपणे ’ हा विचार दडलेला असतो. चारित्र्याची सर्व मदार स्त्रियांच्या खांद्यावर लादण्यात आली आहे. कोणती जात श्रेष्ठ किंवा कनिष्ठ हे सुद्धा ठरवलं जात ते त्या जातीतील स्त्रिया किती आणि अशा प्रकारच्या बंधनात आहेत यावरून. ‘आमच्या स्त्रिया’ अस करतात, करत नाही हि परिभाषा त्यासाठी वापरली जाते. उदा. आमच्या स्त्रिया दुसर्याच्या दारात धुणीभांडी करत नाही, आमच्या स्त्रिया डोक्यावरचा पदर पडू देत नाहीत…..इ.

जाती-धर्माचे ठेकेदार स्वयंघोषितपणे काही फर्मान काढत असतात. ती जरी पहिली तरी त्यामागे कार्यरत असणारा स्त्रियांना दुय्यम लेखणारा,त्याच्यावर लैंगिक नियंत्रण ठेवणारा, अप्रतिष्ठा करणारा शुद्धीचा-पावित्र्याचा दृष्टीकोन सहजच अधोरेखित होतो. मागील दोन दशकात स्त्रियांवरील हिंसाचाराच्या घटना कमालीच्या वाढलेल्या होत्या तेंव्हा बलात्कार पाश्चात्य संस्कृतीमुळे होतात, स्त्रिया तोकडे कपडे घालतात म्हणून बलात्कार होतात…अशी अनेक मुक्ताफळे उधळली गेली होती. स्त्रियांवरील हल्ले, हिंसा रोखण्याचे हमखास उपायही सुचवले गेले होते. सातच्या आत घरात, बुरखा घाला, सर्व अंग झाका, संस्कृती पाळा…..अर्थात हे सर्व फक्त स्त्रियांनी करायचे, पुरुषांनी नाही. हा दुटप्पीपणा सर्वच धर्मात दिसून येतो.

एका सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या वाहनावर एक ‘सुविचार’ लिहिलेला होता, ‘तुम रहेना नाकाबमे, दुनिया रहेगी औकात मे’ तुम रहेना नकाबमे याचा अर्थ स्त्रियांनी नकाब घालावा असा होता, पण पुढील अर्धे वाक्य ‘दुनिया रहेगी औकात मे’  असे होते. ते ‘मर्द रहेंगे औकात मे’ असे का नव्हते?कारण सरळ आहे, नकाब मध्ये रहा, त्यातच तुमची प्रतिष्ठा आहे, नकाब घेणाऱ्या स्त्रिया म्हणजे श्रेष्ठ, पवित्र, शुद्ध असा  (एखादी वस्तू झाकून ठेवल्या प्रमाणे ) स्त्रियांना थेट उपदेश करायचा आहे. तुम्ही असं वागलात नाही तर तुमची धडगत नाही, कोणीही तुमच्यावर हल्ला करू शकते. कपड्यांनी पूर्ण अंग झाकून घेणाऱ्या स्त्रिया घरंदाज असतात इतर मात्र नाही. स्वतंत्रपणे, स्वेच्छेने वागणाऱ्या स्त्रिया तशा नसतात हा सांगावा हा ‘सुविचार’ देत होता. पण तुमच्यावर हल्ला करणार कोण? कोण ‘औकात ’ मध्ये राहणार नाही? त्या ‘मर्द गाड्या’बद्दल ‘सुविचार’ काहीच बोलत नाही. शिवाय दुनिया ‘औकात’मध्ये राहावी म्हणून तुम्ही स्वतःला कड्यात गुंडाळून घ्या असे सुचविणे म्हणजे चोर सोडून भलत्यालाच फाशी असाच प्रकार आहे. ‘मर्द रहेंगे औकात मे’अस लिहील गेल नाही कारण ‘सुविचार’ करणारा, या विचारला नैतिक अधिष्ठान देणारा धर्म कल्पना आणि धर्म प्रमुख, आणि प्रत्यक्ष वाहनावर हा ‘सुविचार’पेंट करणारा सारेच पुरुष! म्हणून आपण स्त्रियांची अप्रतिष्ठा करणारे, दुय्यम लेखणारे काहीबाई लिहत आहोत याचा साधा विचारही केला गेलेला दिसत नाही. उलट आपण स्त्रियांना कसे सदमार्ग दाखविला याचेच समाधान या ‘सुविचार’कर्त्यांना आहे.

नकाब न घालता किंवा कोणतेही जात-उपजत-धर्म सूचक चिन्ह, प्रतीके न घालता जगण्याचा अधिकार स्त्रियांना नाही का? सर्व चीन्हसंहिता फक्त स्त्रियांसाठीच का ? आणि हा कोणता नियम ? असा कसा न्याय ? समस्त पुरुषांची ‘औकात’ पुरुषांवर अवलंबून नाही तर स्त्रियांना बंधनात घालून राखली जाणार आहे. पुरुषांनी नेहमीच लैंगिक हल्ल्याच्या तयारीत राहावे असाच तर याचा अर्थ नाही ना ? दिसली नकाब रहित स्त्री, दिसली तिच्या आवडीचा पोशाख घातलेली स्त्री की करा तिच्यावर हल्ला, अशा राहणाऱ्या स्त्रिया म्हणजे अत्याचार करायला उपलब्ध आहेत असे तर म्हणायचे नाही ना ?मित्रानो, तुमची ‘औकात’ खर तर तुमच्याच हातात, तुमच्यावरच ती अवलंबून आहे. जनावर आणि माणूस प्राण्यात एवढा फरक असायलाच हा ना ?मुळात स्त्रियांना बाई म्हणून, एक भोगाची वस्तू म्हणून, एक निव्वळ जननयंत्र म्हणून बघण्याची दृष्टी बदलण्याची गरज आहे. स्त्री-पुरुष यांना समान मनण,दोघांचा व्यक्ती म्हणून विचार होण गरजेच आहे. सत्यशोधक ताराबाई शिंदे यांनी ‘स्त्री-पुरुष’ तुलना हे पुस्तक लिहून १३३ वर्ष उलटून गेली आहेत. स्त्री-पुरुष असमानतेवर त्यांनी आसूड चालविला होता. आपण म. फुले, डॉ. आंबेडकर यांच्या सारख्या महामानवानकडून काहीच शिकणार नाही का ? म.फुल्यांनी ‘जसे शुद्र तशी स्त्री हीन, तयांवर शस्त्र धरिती मतिहीन’ असे म्हंटले आहे. आपण स्त्रियांवर विचार-मूल्य-संस्कृती-धर्मातील विषमतेची शस्त्रे उगारत आहोत याचे भान ठेवायला हवे. डॉ. आंबेडकर यांनी स्त्रियांवर बंधने लादणाऱ्या मनुवादाच्या विरोधात सडेतोड विचार मांडले आहेत. त्यांनी स्त्रियांवर बंधने लादून देशात जातीव्यवस्था अस्तित्वात आणली गेली हे सिद्धांत स्वरुपात मांडले आहे. सर्व समतावाद्यांनी मनूच्या मॅडनेसच्या विरोधात उभे ठाकले पाहिजे.

म. बसवेश्वरांच्या अनुभव मंटप – म्हणजे विचार परिषदेत अक्क मह्देवी यांनी प्रवचन दिले होते. स्त्रीदास्य आणि जाती व्यवस्थेच्या विरोधात हा विचार उभा होता. २१ व्या शतकात जातीस्त्रीदास्यान्ताचा हा विचार वाणवा चेतविला पाहिजे. असे ‘सुविचार’ लिहिण्याला बंदी केली पाहिजे. परंतु हा प्रश्न फक्त बंदीचा अर्थातच नाही. स्त्री-पुरुष समतेचा विचार अधिक प्रमाणात समाजात रुजविणे काळाची गरज आहे. समाजात उघडपणे पेरल्या जाणाऱ्या स्त्रीविरोधी विचार-व्यवहाराला ठामपणे नकार दिला पाहिजे, विचार आणि व्यवहार यांचे द्वंद्वात्मक नाते असते. असे ‘सुविचार’ मांडले जातात, त्याला‘स्वाभाविक’ मानले जात अनेक व्यवहार केले जातात कारण जात-पुरुषसत्ताक विचार-व्यवस्था अस्तित्वात आहे म्हणून. निर्हुतीच्या सर्व लेकरांनी मिळून या विचार-व्यवस्थाच्याविरोधात लढा संघटीत करयाला हवा.

लेखिका अब्राह्मणी स्त्रीवादाच्या पुस्कर्त्या आहेत. राज्यशास्त्राच्या प्राध्यापक असून सत्यशोधक कम्युनिस्ट चळवळीत त्यांचे सक्रिय योगदान आहे.

Write A Comment