fbpx
राजकारण

त्रिपुरा निवडणुक निकाल – गाफील न राहण्याचा इशारा

नुकत्याच इषान्य भारतातील नागालँड, मेघालय व त्रिपुरा या तीन छोटेखानी राज्यातील विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. या सर्व राज्यातून भाजपचा विजय -हजयाल्याचे स्पश्ट -हजयाले आहे. या तीनही राज्यापैकी त्रिपुरातील निकाल तसे सर्वांनाच अनपेक्षित आहेत. तषीच प्रतिक्रिया तेथील माजी मुख्यमंत्री काॅ. माणिक सरकार यांनीही व्यक्त केली आहे. ज्या राज्यात यापूर्वी -हजयालेल्या निवडणुकीत भाजपाला आपले डिपॉजिटही वाचविता आले नव्हते तेथे त्यांनी दोन त्रितीयांश बहुमत मिळविले.ज्या त्रिपुरात भाजपाचा एकही आमदार तर नव्हताच पण पोलिंग एजंटही ज्यांना मिळत नव्हता त्या भाजपाने ही किमया कषी केली? मागील विधानसभा निवडणुकीत त्यांनी उभे केलेल्या 50 पैकी 49 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली होती, अषा भाजपाने यावेळी 50% मते कषी मिळविली? मागील निवडणुकीत 1.5% मते मिळिवणाऱ्या भाजपाला यावेळी 43% मते कषी मिळाली? अत्यंत स्वच्छपणे सतत 25 वर्शे सत्तेत राहिलेल्या व मागील निवडणुकीत 60 पैकी 49 इतक्या प्रचंड जागा मिळविलेल्या माणिक सरकारची एव-सजयी अधोगती एकाएकी कषी -हजयाली? निदान पष्चिम बंगालप्रमाणे तेथे नंदिग्राम-सिंगूर मधील षेतकÚयावरील गोळीबारासारखे किंवा तत्सम सरकारची नाचक्की होईल असे कोणतेही प्रकार तेथे घडले नव्हते. भाजपने प्रयत्न करूनही गुजराथ, उत्तर प्रदेष सारखी दंगलही -हजयाली नव्हती. आदिवासी-बंगाली गेल्या कित्येक वर्शापासून गुण्यागोविंदाने राहत होते. त्या राज्यातील भ्रश्टाचाराचे एखादे प्रकरण गाजले असेही वाचण्यात,पाहण्यात अथवा ऐकण्यातही नाही. स्वतः माणिक सरकार व त्यांच्या मंत्रीमंडळातील सदस्यांनी भाजपच्या नेत्याप्रमाणे कोणती बेताल वक्तव्ये केली, असेही ऐकिवात नाही. ते स्वतः व त्यांचे कुटुंबीयसुध्दा अत्यंत साधे व काटकसरीचे जीवन जगत होते, हा आदर्षवाद त्रिपुराच्या जनतेला योग्य वाटला नाही, असे म्हणता येईल काय? तसे जर नसेल तर मग मागील निवडणुकीत 49 जागा मिळविलेल्या माणिक सरकारला या निवडणुकीत 18 इतक्या कमी जागा कषा मिळाल्या?

बरे दुसरीकडे भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र व राज्य सरकारांची खुपच दैदिप्यमान कामगिरी -हजयालेली आहे असे त्रिपुराच्या जनतेला वाटले असेल असेही म्हणवत नाही. कारण इतर राज्यांच्या तुलनेत ते अविकसित राज्य असले व त्यामुळे त्यांना जीएसटीचा जाच फारसा -हजयाला नसला तरी नोटाबंदीचा त्रास तर सोसावाच लागला. योगी आदित्यनाथ, स्मृती इराणी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित षहा इत्यादिसारखे 52 मंत्री व 200 खासदार तेथे प्रचाराला गेले होते, ते ठिक आहे, पण तेथील जनतेला यांची कामगिरी माहित नव्हती? उत्तर प्रदेषमधील गरीबांची षेकडोंनी बालके प्राणवायुअभावी मरतात हे तरी तेथील आदिवासींना माहित असावे? तेथे आता मोदींनी विकासाचे भरघोस आष्वासन दिले असले तरी 15 लाखाचे काय झाले असे कोणीतरी विचारलेच असेल ना? त्रिपुरात बेकारीचे प्रमाण खूपच असले तरी देषातील बेकारांची काय परिस्थिती आहे? बेकारांना भजी विकण्याषिवाय यांनी कोणता सल्ला दिला आहे? इषान्य भारताच्या राज्यातील बहुसंख्य जनता ख्रिष्चन धर्मीय असून तिकडे बीफ खाण्याचे प्रमाण बऱ्यापैकी आहे. मग त्यांना भाजपाचे बीफ बद्दलचे धोरण माहित नव्हते? इतकेच नव्हे तर मुस्लिमानंतर ख्रिष्चनच त्यांचे दोन क्रमांकाचे शत्रू आहेत हे सामान्य जनतेला माहित नसले तरी त्यांच्या विविध संघटनातील पु-सजयाऱ्यांना माहित होते. त्यांनी त्यांच्या जनतेला याबद्दल काय सांगितले? तिकडील जनतेला राश्ट्रवाद माहित नव्हता असे म्हणतात पण स्वातत्र्य चळवळीत इंग्रजांची चाकरी करणारे लोक कुठेही व कोणालाही कोणता राश्ट्रवाद षिकवू षकतील? पण तरीही दोन त्रितीयांश बहुमत भाजपाला कसे मिळाले?

याचे उत्तर प्रसारमाध्यमांनी दिले ते असे की कोणीतरी सुनिल देवधर नावाचा एक मुंबईचा इसम आहे, तो आरएसएसचा कट्टर सेवाभावी कार्यकर्ता आहे, त्यांनी यापूर्वी पंतप्रधानांच्या गुजराथमधील दाहोद, यु पी तील वाराणसी मतदारसंघाची व तेथील मां गंगा नदी साफ करण्याची कामगिरी उत्तमप्रकारे पार पाडली आहे, त्यामुळे प्रभावित होऊन संघाने त्यांच्यावर त्रिपुराच्या प्रचाराची जबाबदारी टाकली होती. ती त्यांनी तेथे भाड्याच्या घरात राहून अत्यंत सचोटीने पार पाडली. त्यांच्या दिमतीला संघाने देषातील आणखीही काही स्वयंसेवक पाठविले होते. तेथे त्यांनी मोठ्या कौषल्याने बुथ प्रमुखापासून तर पन्नाप्रमुखापर्यंतची प्रचाराची रचना केली. याप्रमाणे ‘वन बुथ टेन युथ’ च्या फाॅम्र्यूल्यानुसार भाजपाला दोन त्रितीयांश मते मिळवून दिल्याचे विष्लेशण प्रसार माध्यमे करीत आहेत. याच्या जोडीला संघाने तेथे फार पूर्वीपासून आदिवासीमध्ये त्यांच्या आरोग्यापासून तर षिक्षणापर्यंत प्रचंड कामे केली होती, त्याचे फळ म्हणजे हे दोन त्रितीयांश बहुमत होय अषीही पुश्टी देवधरांच्या कामगिरीषी जोडली जाते. वर उल्लेख केल्याप्रमाणे सत्तेत असलेल्या उत्तर प्रदेषातील बालके जेथे प्राणवायूअभावी मरतात तेथे सत्तेत नसतांना यांनी आदिवासींच्या आरोग्याची कोणती काळजी घेतली असेल? विदेषी फंडावर चालणाÚया एनजीओसारखी? मराठीच्या नावाने गळा का-सजयणारे महाराश्ट्रातील सत्ताधारी भाजपवाल्यांनी जेथे गरीब मराठी मुले षिकणाÚया मराठी षाळा बंद केल्यात ते खरोखरच इषान्य भारतातील आदिवासींच्या षाळा निट चालवतील? ओरीसा राज्यात आदिवासीमध्ये खरोखरच सेवाभावी पद्धतीने काम करणाÚया मिषनरी ग्रॅहम स्टेन्स यांना जीपगाडीमध्ये त्यांच्या लहान मुलांसह जीवंत जाळणारे लोक, आदिवासीमध्ये सेवाभावी पद्धतीने काम करू षकतील? यु.पी, बिहारमधून मुंबई, महाराश्ट्रात नोकरीस आलेले भैये लोक जेथे यांना चालत नाहीत तेथे आपल्या राज्यकारभारात -सजयवळा-सजयवळ करणारे बाहेरचे लोक त्रिपुराच्या जनतेने कसे सहन केले असतील? पण दोन त्रितीयांश मते मिळविली हे पटविण्याासाठी प्रसारमाध्यमे मात्र तसे चित्र भारतीय जनतेपु-सजये रंगवित आहेत हे मात्र निष्चित.

मग असे जर नसेल तर भाजपाला तेथे दोन त्रितीयांश जागा कषा मिळाल्या हा प्रष्न उरतोच.

काॅ.माणिक सरकार यांनी अषा निकालाची अपेक्षा केली नव्हती याचा अर्थ त्यांनी व त्यांच्या माक्र्सवादी कम्युनिस्ट पक्षाने हे आव्हान फार गांभिर्यांने घेतल्याचे दिसत नाही. तषातच तो पक्ष सध्या काँग्रेस बरोबर आघाडी करावी की करू नये, भाजपाचे आव्हान फॅसिस्टांचे आहे की निरंकुष सत्तेचे आहे, अषा द्विधा मनस्थितित व पक्षांतर्गत वादात अडकला आहे. त्याचाही परीणाम ही निवडणुक ल-सजयविण्यात झाला असण्याची षक्यता आहे. तसेच गेली 25 वर्शे ते सातत्याने तेथे सत्तेत असल्याने पक्ष कार्यकत्र्यांच्या जीवनमानात झालेल्या सुधारणेमुळे आलेला अहंभाव व त्यातून निर्माण झालेले षैथिल्य याही बाबी त्यास हातभार लावणाऱ्या ठरल्या असाव्यात. तद्वतच सातत्याने सत्तेत असणाऱ्या सत्ताधाऱ्यांविरोधात असलेला काहिंसा राग तेथील जनतेतही असण्याची षक्यता आहेच, त्याचाही परीणाम कमी मते पडण्यात होऊ षकतो. तषातच जनतेच्या माणसिकतेत काळानुरूप व भांडवलीवृत्तीच्या जागतिकीकरणाच्या आताच्या काळात होत असलेल्या बदलाची नोंद या कम्युनिस्ट पक्षाने घेतली नाही असे दिसते. केवळ गरीबासारखे काटकसरीने साधेसरळ राहणे हे आताच्या काळात आदर्ष मानले जात नाही. विरोधकाकडून त्याची टिंगलटवाळीच होण्याची व आकांक्षा वा-सजयलेल्या जनतेकडून त्याला प्रतिसाद मिळण्याचीच जास्त षक्यता आताच्या काळात असते. उदा.पष्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री काॅ.बुद्धदेव भट्टाचार्य यांच्या पत्नीही षिक्षिका होत्या. त्या जेथे नोकरी करीत होत्या तेथून त्यांचा 4-6 महिने पगार होत नव्हता. अषा वेळेस लोक म्हणायचे ‘अरे, हे यांच्याच पत्नीचा पगार वेळेवर करू षकत नाहीत तर आपला काय करू षकतील?’ आपणणच गरीबी अवस्थेत राहिल्यानंतर श्रीमंतीची आस असणारे लोक आपल्याकडे त्यांच्या आकांक्षांची पूर्ती करणारे म्हणून पाहू षकत नाहीत, याची नोंद घेउन पक्षाने योग्य तो बदल करायला हवा होता असे वाटते. असा बदल सत्ताधारी पक्षाने केला आहे हेही आपण समजून घ्यायला पाहिजे. याचा अर्थ आपण पूर्णपणे त्यांच्यासारखे व्हायला हवे असा मात्र नाही.

तेंव्हा काॅ.माणिक सरकार व त्यांच्या माक्र्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वरीलप्रमाणे काही कमकुवत बाबी व भाजपची फारषी काही कर्तबगारी नसली तरी इ व्ही एम मषीन वापरण्यातील त्यांचे कौषल्य अषा संयुक्त योगाने त्यांना दोन त्रितीयांश जागा मिळाल्या असाव्यात असे तर्कदृश्ट्या वाटते. या मषीनचा सर्रास व सरसकट गैरवापर होत असेल असे नाही, पण आवष्यकतेनुसार व कोणाला षंका येणार नाही, या पद्धतीने मात्र त्याचा वापर होत असावा अषी षंका येते. त्यासाठी केवळ एखादा टक्का मतांचा फेरफार केला तरी निवडणुक निकालाचे पारडे फिरविण्यास पुरेसे ठरते. पण त्याबाबतचा ठोस पुरावा उपलब्ध होउ षकलेला नाही. आणि आता तर पुराव्याषिवाय असा आरोप करणे व नंतर तो सिद्ध न करू षकणे हा आता गुन्हा समजून 6 महीनेपर्यंतचा तुरूंगास भोगावा लागण्याची तरतूद असणारा कायदा करण्याच्या विचारात सत्ताधारी असल्याचे सुतोवाच निवडणुक आयोगानेच केले असल्यामुळे असा आरोप करणे अती धारिश्ट्याचे ठरणार आहे. मात्र तरीही फॅसिस्ट काहीही करू षकतात यावर माझ्ाा ठाम विष्वास आहे.

आरएसएसचे शत्रू अनुक्रमे मुस्लिम, ख्रिष्चन व कम्युनिस्ट असल्याचे त्यांच्या ‘विचाराच्या गठ्ठ्यात’ (बंच आॅफ थाॅट) नमुद आहे. षेवटचे दोन क्रमांक आवष्यकतेनुसार ते खालीवर करू षकतात. म्हणूनच त्यांनी मुस्लिमानंतरचा पहिला हल्ला डाव्यांचा किल्ला असलेल्या जे.एन. यु.वर केला होता. पण तेथील विद्यार्थी संघटनांनी व कन्हैय्या कुमार, षाहिला राषिद, उमर खालीद, रामा नागा, अनिर्बान भट्टाचार्य यासारख्या विद्यार्थी नेत्यांनी हालअपेश्टा व राश्ट्रद्रोहासारखे गंभीर आरोप सहन करून मोठ्या जिद्दीने व चिकाटीने परतवून लावला. तसा त्रिपुरावरील आरएसएसचा निवडणुकीच्या माध्यमातून झालेला हल्ला मात्र माक्र्सवादी कम्युनिस्ट पक्ष परतवू षकला नाही, याची खंत देषभरातील तमाम फॅसिस्टविरोधी परीवर्तनवादी कार्यकत्र्यांना वाटत राहील.

लेखक डाव्या चळवळीतील कार्यकर्ते आहेत.

2 Comments

  1. Sunil Dhenglr Reply

    बनसोड साहेब, तुम्ही उत्तर शोधायच्या ऐवजी प्रश्नच प्रश्न उभे केलेत की भौ….तुम्ही सावकाश ऐनालिसिस की काय म्हणता ते व्यवस्थित कागदावर उतरवुन द्या म्हणजे आम्हाला कळेल….एक बातमी तेवढी सांगतो,कालच तुमच्या नांदेड शहरातील गौरी देशपांडे नावाची एक भरपुर शिक्षण घेतलेली मुलगी, RSS च्याच घरातली मुलगी, स्वतःच घर दार आई बाप सोडुन हजारो कि. मी. लांब असलेल्या नागालैंड इथे RSS च्या परिवारातील एका संघटनेचे काम करायला बाहेर पडली…तीला निरोप द्यायला शेकडो लोक होती अन् प्रत्येकाच्या डोळ्यात तीचं कौतुक होतं. २५ वर्षापुर्वी सुनील देवधर पण असाच गेला होता त्या भागात… हळु हळु त्याने माणसं बांधली…. पाय रोवायचे असतील अन् काम करायचं असेल तर असंच खपावं लागतं…नेहमी नेहमी हातात झेंडे घेऊन रस्त्यावर मोर्चे काढल्याने काम झाली असती तर बुध्ददेव भट्टाचार्य व माणिक सरकार यांचा पराभव झालाच नसता…बाय द वे माझ्या कॉम्रेड मित्रांनी माणिक सरकार एका चांगल्या कॉम्रेड चा सुपडा साफ करुनच सत्तेवर आले होते असं तोंड काळं करुन सांगतात ते खरं आहे का? गोष्ट आपल्यातच ठेवा…फार काही इथं तिथं गवगवा करु नका… तोंड आपटलं तरी लालच होतं….आपल्याला तर ते हवंच असतं नाही का?

Reply To Sunil Dhenglr Cancel Reply