Tag

rahul gandhi

Browsing

व्यापार, उद्योग इथेही खासगी मालकी, कुटुंबाचा वारसा हा हिंदुत्व प्रकल्पाचा पाया आहे. मेरीट हा फक्त आरक्षणविरोधक उच्च जातींना सुखावण्याचा मुद्दा होतो. तिथेही काही राजकीय हिंदुत्वाची स्पष्ट भूमिका नाही. मराठा आंदोलन, धनगर आरक्षण ह्यातून पारंपरिक वारसा, जातीचा, धर्माचा अभिमान आणि घराणे यांचा आणि हिंदुत्वाचा काही संघर्ष नाही हे उघड झालेच आहे. म्हणून मुद्दा केवळ भाजप, कॉंग्रेस आणि इतर पक्षात किती घराणेशाहीचे वारस आहेत ह्यांची मोजदाद करायचा नाही. तर घराणे, कुटुंब, जाती, धर्म इ. चा परंपरावादी प्रवाह आपल्या सामाजिक जीवनात किती बळकट आहे आणि प्रस्थापित राजकीय पक्ष त्याची चौकट या ना त्या प्रकारे बळकट करताना दिसतात त्याची कारणे तात्कालिक किंवा विशिष्ट पक्षसापेक्ष नाहीत, ती अधिक खोलवर रुजलेली आहेत. खरे लोकशाहीकरण हे केवळ ह्या प्रस्थापित परिस्थितीशरण चौकटीपलीकडेच शक्य आहे.

–राहुल वैद्य

कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी बर्कले विद्यापीठात नुकत्याच दिलेल्या भाषणाची थोडीफार चर्चा झाली. नेहमीप्रमाणे राहुल गांधी हे ‘पाहुणे कलाकार’ थाटाचे, विदूषकी राजकारणी आहेत, कॉंग्रेस साठी ‘असून अडचण, नसून खोळंबा आहेत’ वगैरे शेरेबाजी गंभीर राजकीय चर्चेचा आव आणत ती खपवण्यात आली. घराणेशाहीबद्दल राहुल यांनी केलेल्या बचावामुळे भाजपला आयतीच गळा काढायची संधी मिळाली आणि पुन्हा एकदा ‘६० वर्षे घराणेशाहीची काळरात्र आणि २०१४ मध्ये उजाडलेला स्वातंत्र्यसूर्य’ वगैरे जुनीच टेप वाजवता आली.