Tag

maratha protest

Browsing

मराठी चित्रपटांतून मराठा समाजाचा पाटील किंवा सरपंच ज्या प्रकारे क्रूर, बलात्कारी व भ्रष्ट दाखवलाय तीच मराठा समाजाची खरी प्रतिमा समजून माध्यमांतून या मोर्चाविषयी लिखाण होतंय. वास्तवातला पाटील, देशमुख आज गांजलेला आहे, शेती पिकत नसल्याने तो हलाखीत आहे, तो सावकार नाही तर सावकाराच्या पेढीवर व्याज भरणारा आहे हे समजून घेणं गरजेचं आहे मराठा क्रांती मोर्चाचा काही आतला आवाज असेलच तर तो हा आहे, पण प्रत्येक जातीची असते तशी मिडिया लॉबी मराठ्यांची नसल्याने हे चित्रच पुढे येत नाही. –अमर जाधव कुठल्याही घटनेचा आतल्या आवाजाशी संबंध जोडायची फॅशन अशात आलेली आहे. नितीशकुमारांनी भाजपाशी पाट जोडून माती का खाल्ली यापासून ते सुनील ग्रोवरने कपिल शर्माच्या शो ला रामराम का ठोकला यापर्यंत सगळ्याच घटनांचं खरं-खोटं किंवा आपल्याला हवं तसं विश्लेषण हे आतल्या आवाजाच्या नावावर खपवल्या जातंय. महाराष्ट्राच्या आजच्या परिस्थितीवर मोठा परिणाम घडवू शकणारी घटना म्हणजे मुंबईत झालेला मराठा क्रांती मोर्चा, या मोर्चाचं आणि त्याच्या राजकीय फायदा तोट्याचं गणित मांडायला मोर्चेकर्यांतून कुणी पुढे आलेलं नसलं तरी…

सर्व भाषणे तारस्वरात केली गेली. त्यात आवेश होता. परंतु विषयाची जाण नव्हती. मोर्चा संपला. परतीच्या प्रवासात सात आठ जण अपघातात मृत्त्यू पावले. अपघाती मृत्यू झालेल्यांसाठी शासनाला जबाबदार धरण्याचा विनोदी प्रकारही झाला. त्या मृत्यू पावलेल्या लोकांच्या कुटुंबियांना मराठा मोर्चाकडून काही मदत देण्यात येणार आहे की नाही हे मात्र कळले नाही. की ती ही शासनानेच द्यायची?

चॅनेलवर येऊन आमचे आईवडील हाडाची काडे करतात, आम्हाला शिकवतात, त्यांना आम्ही काय देणार असा प्रश्न विचारणारी मुलगी कोणत्या प्रकारचे शिक्षण घेते,  त्यातून तिची काय प्रकारची पात्रता निर्माण होते आणि तिला कोणती नोकरी हवी याचा पाठपुरावा करण्याची गरज आहे. कारण हा तपशील त्या मुलीने चॅनेलवर तरी सांगितलेला नाही.  मराठा नसलेल्या लोकांची मुले कशी शिकतात, त्यांचे आईवडिल हाडाची काडे करत नाहीत का,  शिक्षणासाठी त्यांना फुकटात प्रवेश मिळतो का आणि किती टक्के मुलांना इतरांना मिळणाऱ्या आरक्षणामुळे फटका बसतो हे त्या मुलींना समजावून सांगण्याची गरज आहे. त्या स्वतः असा अभ्यास करतील अशी शक्यता नाही.

–धनंजय कर्णिक

मुंबई शहरात ऑगस्ट महिन्यात दोन मोर्चे निघाले. एक “मार्च फॉर सायन्स” या नावाने आणि दुसरा मराठा क्रांति मोर्चा. मार्च फॉर सायन्स या मोर्चाचे आयोजन देशातल्या ३० शहरांत करण्यात आले होते. देशात विज्ञान विचाराला प्राधान्य असावे, विज्ञानाच्या अभ्यासासाठीची दिली जाणारी सरकारी मदत कमी केली जाऊ नये आणि त्यासाठीची आर्थिक तरतूद कमी करू नये याचबरोबर समाजात विज्ञाननिष्ठा जोपासण्याचा प्रयत्न केला जावा या हेतूने जाहिराती न देता हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात घोषणा नव्हत्या. मोर्चाच्या शेवटी भाषणे केली गेली नाहीत. या मोर्चावर सरकारने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. दखलही घेतली नाही. या मोर्चात सहभागी होण्यासाठी राजकीय पक्षांची चढाओढ नव्हती. मुंबईतल्या या मोर्चात २७० जणांचा सहभाग होता. ऑगस्ट क्रांती मैदानापासून सुरू झालेला हा मोर्चा गिरगाव चौपटीवर विसर्जित करण्यात आला. तिसरा मोर्चा आदिवासींचा होता. तो तलासरीला मुंबईपासून दीडशे किलोमीटर अंतरावरच्या गावात निघाला. त्याला लाखापेक्षा जास्त आदिवासी उपस्थित होते. या मोर्चाचे कारण सरकारला अत्यंत अडचणीचे होते. त्यामुळे त्याची दखल ना सरकारने घेतली ना माध्यमांनी. तो मोर्चा तथाकथित समृध्दी महामार्गाला विरोध करण्यासाठी काढण्यात आला. त्यासाठी पालघर, डांग आणि धुळे आणि जळगावचे आदिवासी आले होते.