Tag

facilitate-fascism

Browsing

समाजवादी साथी फॅसिझम दिसता खाती माती असं म्हणणं हे अर्धसत्य आहे कारण प्रश्न केवळ फॅसिझमविरोधी लढाईत दगा  देण्याचाच नाही.  संघाच्या फॅसिझमला मुख्य प्रवाहात आणण्याचं समाजवाद्यांचे योगदान वादातीत आहे. आचार्य नरेंद्र देव यांच्यासारख्या थोर  दार्शनिक नेत्याचा आणि नंतरच्या टप्प्यावर मधू लिमयेंचा अपवाद वगळता समाजवादी पक्ष /आंदोलनाला वैचारिक राजकीय दिशा देणाऱ्या नेत्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे फॅसिस्ट रूप कितपत  कळले होते, आणि कळलेच तर त्याचा धोका कळला होता का, असा प्रश्नच पडण्यासारखा त्यांचा इतिहास राहिला आहे. “संघ फॅसिस्ट असेल तर ,मीही फॅसिस्ट आहे’’, असे उद्गार काढून संघ फॅसिस्ट नसल्याचे सगळ्यात मोठे सर्टिफिकेट देणारे जयप्रकाश नारायण होते, हे विसरता येणार नाही. आणीबाणीच्या विरोधात काहीही कृती न केलेल्या -तुरूंगातून इंदिरा गांधींना माफीनामे लिहून पाठवणाऱ्या संघ -जनसंघीयांना जनता पक्षाच्या माध्यमातून केंद्रीय सत्तेपर्यंत घेऊन जाणारे समाजवादीच होते. संघ बदलतोय –संघ बदलतोय असा धोशा लावणाऱ्यांमध्ये खुद्द एसेम जोशी होते आणि राम बापटांसारखे समाजवाद्यांचे `मार्गदर्शक विचारवंत’ राष्ट्रकार्यात संघाची भूमिका काय असावी, यावर विस्तृत लेखही लिहीत होते.

नचिकेत कुलकर्णी

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना पाठिंबा देऊन नितीशकुमारांनी पुन्हा एकदा समाजवाद्यांच्या अवसानघातकीपणाचा दाखला दिला आहे. संघ-भाजपविरोधातील लढाईमध्ये नितीशकुमार हे आयत्या वेळी दगा देणारे बेभरवशाचे साथी आहेत आणि कुठच्याही क्षणी ते संघाच्या मांडीवर बसायला तयार होऊ शकतात हे उघड आहे. यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही. कारण जवळजवळ २० वर्ष नितीशकुमार  आधी समता पक्ष आणि नंतर जनता दल युनायटेड  हे त्यांच्यासोबतच होते , आणि जद (यु) चे प्रवक्ते आणि खासदार के. सी. त्यागी  यांच्या अलीकडच्या विधानावरून तर त्यांना भाजपसोबतच्या सुखाच्या दिवसांच्या आठवणींचा उमाळा येतोय अशीच स्थिती दिसते.